Sunday, 20 September 2020
शाळा भेट
काल झालेल्या शाळा भेटीमध्ये निसर्गरम्य अशा ठिकाणी जोगेश्वरी वस्तीच्या पवित्र भूमी मध्ये वसलेले गाव व तेथील जोगेश्वरी वस्ती शाळा मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर कच्च्या रस्त्याने जावे लागतेे शाळेमध्ये इयत्ता चौथी पर्यंत वर्ग असून 21 विध्यार्थी आणी1 शिक्षक कार्यरत आहे यापूर्वी या शाळेची 7 होती श्री शिंदे सर यांनी विद्यार्थी संख्या वाढवून टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आज 21 विद्यार्थी शाळेमध्ये आहेत सर्व विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. विशेष या शाळेत परिसरातील परप्रांतीय 3 विध्यार्थी शिक्षण घेत असून त्याची प्रगती सुध्दा समाधान कारक आहे.पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन अतिशय चांगले आहे शिंदे सर तळमळीने काम करत आहे शालेय रेकॉर्ड कसे असावे याचा उत्कृष्ठ नमुना आपल्या ला या शाळेत पहावयास मिळतो.प्रत्येक रजिस्टर च्या पहिल्या पानावर प्रमाणपत्र देण्यात आलेले असून सर्व नोंदी अचूक व बरोबर विना खाडाखोड करण्यात आलेल्या आहेत
शाळेमध्ये संगणक चालू आहे. नुकताच सरांनी स्वतःच्या वेतनातून खर्च करून शाळेसाठी एक एलईडी टीव्ही घेतलेला आहे टिव्ही व संगणकाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य मनापासून शिंदे सर करतात त्यांच्या कार्याला सलाम आहे.
हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment