Sunday, 20 September 2020
रजा सूचना
मु अ रजेच्या बाबतीत सूचनापत्र
प्रति, दि.04/01/18
मुख्याध्यापक (फक्त जिल्हा परिषद शाळा)
(केंद्र:आमठाणा ता,सिल्लोड,)
*विषय:रजेच्या कालावधी मदये वर्ग अध्यापन नियोजन करणे बाबत.*
संदर्भ :- मा. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सिल्लोड यांचे दि.23/12/2017 चे सभेतील सूचना
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास सूचित करण्यात येते की, आपल्या केंद्रातील सर्व शाळातील किरकोळ रजेवर जाणरया शिक्षकाचे वर्ग अध्यापन नियोजन करण्यात येत नसल्याचे व शिक्षक शाळेवर उशिरा जात असल्याचे व पूर्ण वेळ शाळेत थांबत नसल्याच्या तक्रारी फोन वरून गावकरी थेट ग शि अ यांना करत असल्याचे दिसून येत आहे तरी या अनुषंगाने आपणास पुढील प्रमाणे कार्यवाही करणाऱ्च्या सूचना देण्यात येत आहे
1:-किरकोळ रजा मंजूर केल्यानंतरच उपभोगावी कोणत्याही परिस्थितीत परस्पर रजा देऊ नये
2:-रजा घेणाऱ्या शिक्षकाची रजा नोंद रजिस्टर मदये नोंद घेऊन त्याचे वर्गाचे अध्यापन नियोजन परिपाठतच करावे व त्याप्रमाणे वर्ग व्यवस्था करावी
3:-अर्जित रजेवर जाणाऱ्या शिक्षकाचे जागी केंद्रीय मु अ यांनी आपल्या /नजीकच्या शाळेवरून लेखी पत्र देऊन वर्ग अध्यापन करीता शिक्षक व्यवस्था करावी
4:-एकदा शाळेवर आले असता पूर्ण वेळ शाळा करावी तथापी काही अति महत्वाचे कामासाठी बाहेर जाणे असल्यास हालचाल नोंद केल्याशिवाय व अति महत्वाची रजिस्टर कुलुप बंद करूनच बाहेर जावे अशी दक्षता घ्यावी
5:- कोणत्याही शिक्षकास विना परवानगी शाळेच्या वेळात कार्यलयात पाठवू नये
6:-शिक्षकास रजा देताना किमान 80 टक्के शिक्षक शाळेवर राहतील याची काळजी घ्यावी
7:-प्रत्येक मुख्याध्यापक यांनी किरकोळ रजा विहित नमुन्यात केंद्रीय मुख्याध्यापक याचे कडून रजा मंजूर करावी व नंतरच उपभोगवी तसेच कार्यलयीन कामासाठी विना परवानगी शाळा सोडून जाऊ नये पूर्ण वेळ मुख्याध्यापक यानी शाळेत हजर राहवे व एक
मुख्य विषय घेऊन वर्ग अध्यापन करावे विध्यार्थ्यांना विचारल्यानंतर आपण वर्ग अध्यापन करतात असे वरिष्ठांचे लक्षात येणे व त्याची नोंद CR मदये होणे असे अपेक्षित आहे
दिलेल्या सूचनांची काटेकोर पणे पालन करावे कोणतेही नियम बाहय काम करू नये
सर्व मुद्दे सूचना वहिवर लिहून प्रत्येक शिक्षाकाची स्वाक्षरी घेऊन त्याची सत्यप्रत मासिक मिटिंग ला येताना केंद्रात जमा करावे
केंद्रप्रमुख
आमठाणा ता सिल्लोड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment