Sunday, 20 September 2020
अल्पसंख्यक
*सर्व मुख्याध्यापक केंद्रीय मुख्याध्यापक प्रशाला मुख्याध्यापक व खाजगी शाळा*
आपल्या केंद्रातील धार्मिक अल्पसंख्याक विदयार्थ्यांसाठी प्रिमॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नविन व नुतनीकरण अर्ज सादर करणे , शाळा व जिल्हास्तरावरील पडताळणी ची मुदत दि. ३१आॅक्टोबर २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. वाढलेली मुदत ही संधी समजुन प्रथमतः शाळा व जिल्हा स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांची पडताळणी पुर्ण करण्यासाठी करावा व एकही अर्ज पडताळणीसाठी कोणत्याही स्तरावर प्रलंबित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी.
शाळा स्तरावर पडताळणीसाठी उपलब्ध झालेल्या अर्जांपैकी जर काही विद्यार्थी या शाळेचे नसतील तर अशा विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट करावेत अशा सक्त सुचना शाळांच्या मु.अ. ना देण्यात येत आहे.
जर अशा काही विद्यार्थ्यांचे अर्ज नजरचुकीने अथवा इतर काही कारणांनी शाळेकडुन अथवा जिल्हास्तरावरुन Verify झाले असतील तर त्वरीत या कार्यालयातील Programer श्री. आशुतोष पाटील यांचेशी संपर्क करावा असे आव्हान मा संचालक दिनकर पाटील पुणे यांनी केले आहे
धर्माबाबतचे पालकांचे स्वयंघोषणापत्र , पालकांच्या उत्पन्नाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला , मागील वर्षीच्या गुणपत्रकाची प्रत , आधार कार्ड , बॅंक पासबुकाची पहिल्यपानाची प्रत , शाळेच्या किंवा शासनाच्या वसतिगृहात रहात असल्यास तसे प्रमाणपत्र व वसतिगृह शुल्काबाबत प्रमाणित दर ही सर्व कागदपत्रे शाळेने विद्यार्थ्यांकडून घेऊन ती शाळेच्या अभिलेखात जतन करुन ठेवणे बाबत व ही कागदपत्रे तपासुनच अर्ज Verify करणेबाबत मुख्याध्यापकांना सक्त निर्देश देण्यात येत आहे याबाबतचा आढावा आज मला ग्रुप वर कळवावा सोबत बाकी असलेल्या शाळेची पेडिंग दर्शक तक्ता दिला आहे
सर्व शाळांनी वरिष्ठाना कळवावा.
*सहकार्य करावे धन्यवाद!... .!!*
*●●केंद्रप्रमुख●●* ✒
श्री व्ही. जी. कुंभारे
केंद्र-आमठाणा व अंधारी
ता.सिल्लोड जि औरंगाबाद
*💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment