Sunday, 20 September 2020
*बाल सभा आयोजन*
या आठवड्यात सर्व केन्द्रतील शाळे मधे *बालसभा* या अभिनव उपक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे....
नियोजनानुसार प्रत्येक महिन्यात एक बालसभा घेण्याचे सर्वानुमते ठरले आहे....
या महिन्यातिल बाल सभा विषय *आपले सन व उत्सव* असा ठेवण्यात आलेला असुन आपन आठवड्यात कोणत्याही एका दिवशी आयोजन करू न त्याचे फ़ोटो वृतांत ग्रुप वर शेअर करण्यात यावा
हा उपक्रम जि प प्रा शा म्हसला बु येथे यशस्वी पणे राबविन्यात येत आहे त्या मुळे या शालेला यजमान पद देण्यात येत आहे
या आठवड्यात शैक्षणिक वर्षातील *प्रथम* बालसभा केन्द्रामधील सर्व शाळेत घेण्यात यावी
काही दिवसांपूर्वी म्हसला बु या शाळेने एक विशिष्ट विषय ठरवून व त्याची तयारी करून घेऊन बालगोपालांना बालसभेचा *पहिलाच* अनुभव दिला....
मुलांमध्ये व शिक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता व उत्साह होता.मुलांनीही बालसभेत हिरारीने सहभाग नोंदवत आपला सभाधीटपणा दाखविला.
त्या प्रसंगी मी उपस्थित होतो व हे पाहुन मी हा निर्णय घेतला आहे
मुलांना दिलेल्या विषयावर आपले स्वतःचे मत मांडता यावे.
त्याने अभिव्यक्त व्हावे.
त्याचे संभाषण कौशल्य व सभाधीटपणा वाढावा...आणि एकविसाव्या शतकातील कौशल्य मुलांना अवगत होण्यास मदत व्हावी हा या बालसभेचा उद्देश आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment