Sunday, 20 September 2020
🔲 *फोकस आमठाणा केंद्र-- शाळा भेटी*🔲
*आज दिनांक 22 जुलै 2019 रोजी केंद्र आमठाणा अंतर्गत भेटी देऊन शिक्षक व विदयार्थ्याशी संवाद साधला...*
💧 *या शाळांना भेटी* 💧
◼1) प्रा.शा .पेंड़गाव के.आमठाणा
◼येथे भेट देऊन वर्ग पहिली ते 5वी तील मुलांची प्रगती जाणून घेतली...व शिक्षकवृंद यांच्याशी गुणवत्तेविषयी अडचणीवर चर्चा केली...
श्री वानखेड़े सर यांचे वर्ग अध्यापन पाहिले वाचनालय उपक्रमाचे लाभ सर्व मुलांना देणार आहेत, व्यवस्थपन समिती अध्यक्ष यांनी समाधान व्यक्त केले शालेय परिसरात जाणीव पूर्वक स्वच्छता करून परिसर प्रसन्न राहिल या साठी महिला शिक्षक यांनी दररोज मूली कडून रांगोली काढवी
वर्ग स्वच्छता बाबत दर्ज़ेदार पध्दतीने काम होईल हे विशेष..
◼ *विशेष--*
सर्व शिक्षकांना मूल प्रगत करण्यासाठी ट्रिक्स सांगितल्या.. स्टॅटर्जी आखून रिझल्ट दाखवा..पुन्हा भेटीत किमान 20% प्रगती दाखवा..असे सांगितले..
◼2) प्रा.शा.घाटनान्द्रा के.आमठाणा
या शाळेत भेट देऊन प्रथम शिक्षकांशी चर्चा केली..नंतर वर्ग बघितले..
◼ *विशेष--* अध्ययन निष्पत्ती व मूलभूत क्षमता यांची सांगड घालून प्लॅनिंगने कसे काम करावे यावर फोकस करून किमान क्षमतेत 15 दिवसात 15% संपादणूक वाढवा व तरच मला बोलवा हे आवर्जून सांगितले..
3)प्रा शा नवनाथ वाड़ी
*परस बाग निर्माण करण्यात येत आहे*
वृक्षरोपण मोहीम अंतर्गत प्रत्येक शिक्षकास 2 फुल झाडाचे कुंडया वर्गाचे समोर लावन्यासाठी आवाहन करण्यात आले होते ही पहिली शाळा आहे यांनी हे काम पूर्ण केले आहे
श्री पारखे सर व भापकर सर यांनी प्रत्येकी 2 कुंडया खरेदी करून केन्द्राचे रजिस्टर वर नोद केली आहे
◼ या शाळेत मूल बिनधास्त पणे व्यक्त होत होती फक्त या अभिव्यक्तीचा वाचन शिकविण्यात उपयोग कसा करायचा हेच शिक्षकांना समजून सांगितले..
◼येथील शिक्षक दररोज एक पान शुद्ध लेखन
हा उपक्रम यसवीरीत्या राबवित असल्याचे दिसून आले
🔲 *या गोष्टीची गरज..*🔲
◼ साहित्य पेटीचा वापर करावा..
◼ प्रत्येक मुलाची क्षमता लक्षात घेऊन संकल्पनेवर आधारित अध्यापन करावे..
◼ मोबाईलचा स्मार्ट वापर करावा..
◼मुलांना जे येतं ते लक्षात घेऊन स्टॅटर्जी आखावी..
◼ दररोजच मुलांनी आपल्या वर्गात का बसावे..यावर चिंतन व्हावे..
◼ *आपल्या शाळेत व वर्गात स्वच्छता चांगली दिसून यावी या साठी प्रयत्न करण्याची गरज आहे*
शालेतिल सर्व डिजिटल साधने दुरुस्ती करून त्याचा वापर करावा
नियोजन करावे ...एकत्र बसावे..यावर चिंतन व्हावे..
केंद्रप्रमुख
श्री व्ही जी कुंभारे
केंद-आमठाणा व अंधारी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment