Sunday, 20 September 2020
ऋण निर्देश
माझ्या सर्व शिक्षकास,
अंधारी केन्द्रात गेली दीड वर्षे आपण एकत्र कार्यरत आहोत. हा काळ माझ्या कारकीर्दीतील महत्त्वाचा कालखंड आहे. मी घेतलेला आणि तुम्ही अंमलात आणलेला प्रत्येक निर्णय अंधारी केन्द्रतील शिक्षणासाठी उपयोगी ठरतो आहे. 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' अंतर्गत आपण केलेला प्रत्येक उपक्रम आज तालुका पातळीवर विद्यार्थिहिताय ठरत आहे. माझ्या कार्यकाळात आपण सर्वांनी मला उत्तम सहकार्य केले आणि आपल्या मदतीने मी आपल्या केन्द्रास शिक्षणक्षेत्रात तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर नेऊ शकलो, याचा मला अतिशय आनंद वाटतो आहे.
नुकत्याच झालेल्या बदलांमुळे यापुढे श्री सज्जन टाकसाळे
केंद्र प्रमुख म्हणून आपल्या केन्द्राची धूरा संभाळनार आहेत आपण माझ्यासोबत जी वाटचाल केली, ती अशीच अविरत सुरू ठेवाल यात शंका नाही.
आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
*सहकार्य करावे धन्यवाद!... .!!*
आपला
*●●केंद्रप्रमुख●●* ✒
श्री व्ही. जी. कुंभारे
केंद्र-आमठाणा व अंधारी
ता.सिल्लोड जि औरंगाबाद
*💢⭕💢⭕💢⭕💢⭕💢*===
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment