Sunday, 20 September 2020

⭕शालेय पोषण आहार *अतिमहत्वाचे* *प्रति* *केंद्रप्रमुख /मुख्याध्यापक सर्व* *ता. सिल्लोड.* *विषय :- दुष्काळग्रस्त/ टंचाईग्रस्त भागातील शाळांमध्ये सुट्टीच्या कालावधीत पूरक पोषण आहार देणे बाबत.* उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास सुचित करण्यात येते की, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आठवड्यातील ३ दिवस दूध/अंडी/फळे/पौष्टिक आहार देण्याचा निर्णय संदर्भीय पत्रान्वये घेण्यात आलेला आहे. तरी दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त गावातील शालेय पोषण आहार योजनेस पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना 3 दिवस पूरक आहार देण्याची सोबत दिलेल्या पत्रानुसार कार्यवाही करण्यात यावी, सदर कामात हयगय किंवा दिरंगाई केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील. सोबत:१)वेळा पत्रक व पत्र २)परिशिष्ट-ब आणि परिशिष्ट-क *गटशिक्षणाधिकारी* *शालेय पोषण आहार* *पं स सिल्लोड*

No comments:

Post a Comment